। संतोष पिळके । चिपळूण ।
कोकणातील शेतकर्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मे.वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा.लि . या दुग्धप्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. 7 सप्टेंबर 2021 रोजी चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूणचे संस्थापक व अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या प्रकल्पाच्या ईटीपी प्लांटचे भूमिपूजन शुक्रवार, दि.18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेयांच्या हस्ते आणि सुभाष चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन शेतकर्यांना दूध चळवळीत सक्रिय करण्याचे ठरवले आणि त्यातूनच मे. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस् प्रा.लि. या प्रकल्पाची संकल्पना आकार घेऊ लागली.
वाशिष्ठी डेअरी’चे प्रॉडक्टस्
दुधासह दही , ताक , लस्सी , श्रीखंड , आम्रखंड , पनीर , तूप , सुगंधी दूध या दुग्धजन्य पदार्थांचेही उत्पादन वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे . अतिशय दर्जेदार आणि कोणतीही तडजोड न करता तयार होणारे हे दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवतील .
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
अत्याधुनिक व स्वयंचलित दूध संकलनासाठी 10 गावे मिळून एक कलेक्शन सेंटर, महत्त्वाच्या ठिकाणी विभागवार दूध वितरण केंद्रे उभारणार, प्रकल्पात सहभागी शेतकर्यांना दर आठवड्याला दुधाचे पैसे अदा केले जातील, शेतकर्यांना गाई -म्हशींचा पुरवठा , खाद्याचा पुरवठा आणि पशुवैद्यकीय सुविधांचा पुरवठा शेतकर्यांसह हजारो तरुणांना रोजगाराची संधी, प्रकल्पाच्या शेतकर्यांच्या मार्गदर्शनासाठी स्वतःचे पशुवैद्यकीय अधिकारी, प्रकल्पाच्या माध्यमातून अत्यल्प दरात शेतकर्यांना पशुखाद्य व चार्याचा पुरवठा, प्रकल्पाबरोबरच दूधसंकलन क्षेत्रात दुधाचा दर्जा तपासण्यासाठी अद्यावत लॅबोरेटरीज मोबाईल व्हॅन.