भारतीय क्रिकेट संघात मोठा बदल

जखमी अक्षर पटेल संघातून बाहेर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला काही दिवस बाकी असताना भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. जखमी खेळाडू अक्षर पटेलची दुखापत अजूनही बरी न झाल्याने त्याच्याऐवजी दुसरा फिरकीपटू आर. अश्विनची 15 सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे.

विश्वचषकाच्या संघात बदल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. त्याचा फायदा करुन घेत बीसीसीआयने अक्षर पटेलच्या ऐवजी रविचंद्रन अश्विनला संधी दिली आहे. आशिया चषकात अश्विनचा भारतीय संघात समावेश नव्हता. पण अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला अन्‌‍ अश्विनचे नशीब बदलले. 37 वर्षीय अश्विन हा भारतात झालेल्या 2011 मधील क्रिकेट विश्वचषकाच्या विजयी संघात होता. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली आणि अश्विन हे दोनच खेळाडू 2011 मधील विजयी संघाचे 2023 च्या विश्वचषकात खेळणार आहेत.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन.

Exit mobile version