काँग्रेस-वंचितचं ठरतंय?

आंबेडकरांसाठी बडे नेते सरसावले, समीकरणं बदलणार?

| मुंबई | वृत्तसंस्था |

वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाची बोलणी फिस्कटली. यानंतर वंचितनं उमेदवारांची घोषणा केली. पण, त्याआधी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची प्रस्ताव दिला. त्यानुसार आंबेडकर नागपूर आणि कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत. तशी घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

काँग्रेसला एकूण सात जागांवर पाठिंबा देण्याची तयारी वंचितनं दर्शवली. कोल्हापूर आणि नागपुरात काँग्रेसला पाठिंबा देत असल्याची घोषणा आंबेडकरांनी केली. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाकी पाच जागांची यादी वंचितला देणार आहेत. या पाच जागांवरही वंचित काँग्रेसला पाठिंबा देईल. त्यामुळे सात जागांवर काँग्रेससाठी निवडणूक काही प्रमाणात सोपी होऊ शकते.

दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेसकडून विचार सुरू आहे. त्यामुळे अकोल्यातील उमेदवारी काँग्रेसकडून मागे घेतली जाऊ शकते. तसे संकेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. ‘आंबेडकर सात जागांवर आपल्याला पाठिंबा देत असतील, तर आपण अकोल्यातील उमेदवारीचा पुनर्विचार करायला हवा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. याची माहिती हायकमांडला देण्यात येईल. त्यानंतर अकोल्याबद्दल निर्णय होईल,’ असं वडेट्टीवार म्हणाले.

Exit mobile version