मोठी बातमी! अजित पवारांचे सर्व आमदार पात्र

। मुंबई । प्रतिनिधी ।

राष्ट्रवादीतील फूट आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय दिला आहे. विधिमंडळ पक्षातील बहुमत हा एकमेव निकष असल्याचं सांगत अजित पवार गटाला 53 पैकी 41 आमदारांचा पाठिंबा असल्याने अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला. अजित पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची शरद पवार गटाची मागणीही नार्वेकर यांनी फेटाळून लावली. त्यामुळे अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र ठरले आहेत. पक्षघटना, नेतृत्वरचना आणि विधिमंडळ संख्याबळ लक्षात घेऊन निर्णय दिल्याचंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

पात्र ठरलेले  41 आमदार
सरोज अहिरे, धर्माबाबा आत्राम, बाळासाहेब अजबे, राजू कारेमोरे, आशुतोष काळे, माणिकराव कोकाटे, मनोहर चांद्रिकेपुरे, दीपक चव्हाण, संग्राम जगताप, मकरंद पाटील, नरहरी झिरवाळ, सुनील टिंगरे, अदिती तटकरे, चेतन तुपे, दौलत दरोडा, राजू नवघरे, इंद्रनील नाईक, मानसिंग नाईक, शेखर निकम, अजित पवार, नितीन पवार, बाबासाहेब पाटील, अनिल पाटील, राजेश पाटील, दिलीप बनकर, अण्णा बनसोडे, संजय बनसोडे, अतुल बेनके, दत्तात्रय भरणे, छगन भुजबळ, यशवंत माने, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप मोहिते, निलेश लंके, किरण लहमते, दिलीप वळसे, राजेंद्र शिंगणे, बबनराव शिंदे, सुनील शेळके, प्रकाश सोळंके. 
Exit mobile version