। मुंबई । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
भारतरत्न, महाराष्ट्र भूषण लतादीदी यांच्या निधनाने एक महान व्यक्तिमत्व हरपले आहे.आपल्या स्वरांची मोहिनी त्यांनी केवळ भारतीयांना नव्हे तर अवघ्या विश्वाला घातली होती. देशाची एकप्रकारे गौरवशाली सेवाही त्यांनी केली. त्यांची असंख्य अविट गाणी आजही सर्वांना भुरळ घालणारी आहेत. असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. – खा. सुनील तटकरे.