रश्मी शुक्लांना मोठा दिलासा!

फोन टॅपिंग प्रकरणातले दोन्ही गुन्हे उच्च न्यायालयाकडून रद्द
| मुंबई | प्रतिनिधी |
फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन गुन्हे रद्द केले आहेत. एक पुण्यात तर दुसरा मुंबईत नोंदवण्यात आला होता.

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभगाच्या प्रमुख या नात्याने विरोधी पक्षातल्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचे हे प्रकरण आहे. फडणवीस सरकारनंतर जेव्हा राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर रश्मी शुक्लांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. नाना पटोले, संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी हे दोन गुन्हे नोंदवण्यात आले होते. ते आता रद्द करण्यात आले आहेत.

फोन टॅपिंगचे प्रकरण काय?
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप रश्मी शुक्लांवर ठेवण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून गुप्तवार्ता विभागाने नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्या नेत्यांचे फोन बनावट नावांनी टॅप करण्यात आल्याचा आरोप आहे. नाना पटोले यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे त्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री रावसाहेब दानवेंचे स्वीय सहाय्यक आणि तत्कालीन भाजपचे खासदार संजय काकडे, अन्य लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करण्यात आले होते.

Exit mobile version