भूखंड घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंना मोठा दिलासा

। नागपूर । वृत्तसंस्था ।

भूखंड घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना नागपूर न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयात विकल्याचा असा गंभीर आरोप गंभीर केला होता.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी नागपूरच्या न्यासाच्या भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली होती.

याप्रकरणी नागपूर न्यायालयाच्या खंडपीठाने मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.

Exit mobile version