| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील कॅनरा बँकेच्या शाखेत दरोडा टाकण्यात आला आहे. यामध्ये अज्ञात दरोडेखोरांनी सुमारे 59 किलो सोन्याचे दागिने आणि 5.2 लाख रुपयांची रोख रक्कम लुटली आहे. ही घटना 25 मे रोजी मनागुली टाउन येथील सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शाखेत घडल्याचे समोर आले आहे. या टोळीने अलार्म सिस्टीम बंद केली आणि लॉकर उघडण्यासाठी एका बनावट चावीचा वापर केला. चोरी केल्यानंतर चोरांनी लॉकरमध्ये सोन्याच्या जागी काळी बाहुली ठेवली होती. देशातील सर्वात मोठ्या दरोड्यांपैकी हा एक दरोडा असल्याचं बोललं जात आहे.
कॅनरा बँकेत मोठा दरोडा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606