राज्यात अ‍ॅम्ब्युलन्स खरेदीत महाघोटाळा- विजय वडेट्टीवार

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यात अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा झाला आहे. या खरेदीत टेंडर फुगवले गेले असून, तीन हजार कोटींचे काम दहा हजार कोटींवर नेले आहे. 30 टक्क्यांच्यावर कमिशन या घोटाळ्यात घेतले गेले आहे. हा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय, या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत, असे सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी मंगळवारी विधानसभेत केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लुटा आणि गुजरातला वाटा, अशा शब्दात त्यांनी सरकारचे वाभाडे काढले.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हे सरकार रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खात आहे. सनदी अधिकार्‍यांनी या घोटाळ्याला विरोध केला म्हणून त्यांची बदलीदेखील झाली. निवडणूक फंडासाठी हा उद्योग सुरू आहे. आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघत असताना हा घोटाळा केला जात आहे. महाराष्ट्र लुटून साफ करण्याचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय, या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत, असे सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली आहे.

Exit mobile version