| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताची विनेश फोगाट हिचे ऑलिम्पिक पदक हुकले आहे आणि तिला अपात्र ठरवले गेले. कारण तिचे वजन काही ग्रॅम अधिक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ऑलिम्पिक समितीने हा निर्णय घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश बिगरनामांकित म्हणून दाखल झाली आणि तिला आव्हानात्मक ड्रॉ मिळाला होता. पहिल्याच सामन्यात तिच्यासमोर टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई ससाकीचे आव्हान होते.
भारतीय कुस्तीपटू 50 किलो वजनी गटात सहभागी झाली होती आणि तिचे वजन हे 100 ग्रॅम अधिक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली आहे. स्पर्धेतील नियमानुसार फोगाटला रौप्यपदकही मिळू शकत नाही. याबाबतची अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे तिला या स्पर्धेच्या शेवटी समाधानी रहावे लागले. गेल्या सहा दिवसांपासून विनेश काहीही खात-पित नव्हती. सामन्यापूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त होते. ती राखणे तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होते आणि तेच घडले.