। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून याकडे लक्ष लागले होते. 78 पानांची निवडणूक आयोगाचे निकालपत्र असून ऑक्टोबर 2022 पासून हे प्रकरण चर्चेत आले होते.
याशिवाय शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्यानं आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारा निर्णय आता जाहिर झाला आहे.