। मुंबई । प्रतिनिधी ।
सध्या आयपीएलमध्ये भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीपर्यंत सर्वच जण अप्रतिम कामगिरी करत आहेत. हे दोन्ही खेळाडू आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. आयपीएलनंतर भारताला टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. त्याबाबत लवकरच भारतीय संघाची घोषणाही केली जाऊ शकते. याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एमएस धोनी आणि दिनेश कार्तिकबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक या हंगामात ज्या प्रकारे फलंदाजी करत आहेत त्यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. धोनीने शेवटच्या सामन्यात फक्त 4 चेंडू खेळले आणि 22 धावा केल्या, त्याने जबरदस्त प्रभाव पाडला. मात्र, धोनीला दुखापत झाल्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये येण्यासाठी त्याला पटवणे कठीण आहे. तो अमेरिकेत येत असला तरी तो गोल्फ खेळायला येणार आहे. याशिवाय, दिनेश कार्तिकला वेस्ट इंडिजमध्ये येण्यासाठी पटवणे सोपे जाईल, असे मला वाटते.