पक्ष, चिन्ह शिंदेंना देण्यामागे मोठी शक्ती; पवारांचे केंद्राकडे अंगुली निर्देश

| चिंचवड | प्रतिनिधी |

शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्यामागे मोठ्या शक्तीचा हात? शरद पवार म्हणाले, याच्या पाठीमागे मोठी शक्ती असल्याची शंका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.

चिंचवड येथे प्रचारसभेत बोलताना पवारांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारकडे अंगुली निर्देश केले. निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह दुसर्‍यांना देण्याचा निर्णय आजपर्यंत कधी या देशात झाला नाही. निर्णय कोण घेतं याची शंका आमच्या मनात आहे. निवडणूक आयोग निर्णय घेतो की, त्यांना कोणाचं मार्गदर्शन आहे. अशी शंकाही उपस्थित केली.

यापूर्वी अनेकदा पक्षात फुटी झाल्या. समाजवादी पक्षात फूट होऊन प्रजा समाजवादी पक्ष झाला. काँग्रेसमध्ये फूट पडून समाजवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाले. मात्र, पक्षच काढून घेत दुसर्‍यांना देणं हे कधी घडलं नव्हतं. जे घडलं याच्या पाठीमागे मोठी शक्ती असल्याचं नाकारता येत नाही, अशी शंका शरद पवारांनी व्यक्त केली. सत्तेचा अतिगैरवापर होतो. एखाद्या पक्षाला आणि नेतृत्वाला नाउमेद करण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा लोक त्यांच्या मागे उभे राहतात. नेते सोडून गेले आहेत. कट्टर शिवसैनिक 100 टक्के उद्धव ठाकरेंबरोबर आहे. त्याची प्रचिती उद्या निवडणूका येतील तेव्हा कळेल, असं विधान शरद पवारांनी केलं आहे.

Exit mobile version