महामार्गांच्या कामासाठी दुचाकी रॅली

| रसायनी | वार्ताहर |

कामोठे टोल नाका ते खारपाडा टोल नाका दुचाकी रॅलीचे आयोजन मुंबई गोवा जन आक्रोश समितीतर्फे करण्यात आले होते. मुंबई गोवा महामार्गाचे काम 12 वर्षे रखडलेले असून मंत्रीमहोदयांची आश्‍वासने, न्यायालयाचे आदेश यांना प्रशासनाने हरताळ फासला आहे. या दिरंगाई आणि ढिसाळपणामुळे अपघातात 3000 पेक्षा जास्त कोकणकर मृत्युमुखी पडले आहेत तर अनेक जण कायमचे जायबंदी झालेले आहेत. या निषेधार्थ काढलेल्या या दुचाकी रॅलीला कोकणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शिस्तबद्धपणे यशस्वीरित्या पार पडला.

वाहतूक उपायुक्त यांनी रॅलीच्या सूचना दिल्यानंतर समितीचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नागरिक देवरुखकर काका यांच्याहस्ते रॅलीला झेंडा दाखवून करण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या आणि समितीच्या पायलट व्हॅन रॅलीचा मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने जाऊन खारपाडा टोलनाका येथे रॅलीची सांगता झाली.

यावेळी अ‍ॅड. अमित चव्हाण, अजय यादव, अ‍ॅड. अजय उपाध्ये, रुपेश दर्गे, दयानंद भगत, अ‍ॅड. सुभाष सुर्वे, रुपेश दर्गे, अ‍ॅड. संदीप वनविचारे, डॉ. अमित चव्हाण, संजय सावंत, सी. ए. संदेश चव्हाण, सोनल सुर्वे उपस्थित होते.

Exit mobile version