मतदार जनजागृतीसाठी बाईक रॅली

। तळा । वार्ताहर ।

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असल्याने मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे यासाठी तसेच लोकशाहीत मतदान हक्काची जाणीव करण्यासाठी प्रशासन पुढे येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तळा येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे आणि सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांच्या आदेशानुसार तळा तहसीलदार स्वाती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळा तहसिल कार्यालय तळा ते बाजारपेठ अशी काढण्यात आली. या बाईक रॅलीत तहसिल कार्यालयातील कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी त्याचबरोबर तालुका कृषी कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच, मतदार नागरीक बंधू भगिनिंनी आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.

Exit mobile version