| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बारवई या ठिकाणी दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात अनय्या दोडाघटा रंगप्पा याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकरपाडा येथे राहणारे अनय्या दोडाघटा रंगप्पा हे सकाळच्या सुमारास स्कुटीवरून पनवेलला जात होते. ते बारवई-पोयंजे येथे आल्यावर त्यांच्या स्कुटीला एका भरधाव वाहनाने धडक दिली. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.