। पुणे । प्रतिनिधी ।
चंदनगर भागातील टाटा गार्डन चौकात भरधाव पीएमपी बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेतील मृत तरुण अशोक घर्ती (32) हे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाला होते. दरम्यान चंदनगर भागातील टाटा गार्डन चौकात आले असता वेगाने येणाऱ्या पीएमपी बसने अशोक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अशोक गंभीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस घटनास्थळी हजर झाले. याप्रकरणी बसचालक रवींद्र गेनबा गायकवाड (40) याच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.