दुचाकी चोरी प्रकरणी वसुंधरा फाऊंडेशनचे निवेदन

। धाटाव । वार्ताहर ।
रोहा रेल्वे स्थानकातून मागील दोन दिवसांपूर्वी दुचाकी चोरीला गेल्या प्रकरणी रोह्यातील वसुंधरा फाउंडेशनच्या पदाधिकारी वर्गाने पार्किंग सेवा पूर्ववत करावी व सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे याबाबतचे निवेदन रेल्वे प्रशासनाला दिले.
दोन दिवसांपूर्वी रोहा रेल्वे स्थानकातून दुचाकी क्र.एम.एच.06 आर. 5337 ही काळया रंगाची हिरोहोंडा चोरीला गेली. मात्र याबाबत दुचाकी मालक अभीजित पाटणकर यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार देण्यास गेले असता सदर तक्रार शहर पोलिसांकडे द्यावी असे सांगितले. स्टेशन प्रबंधक यांच्याकडेही याबाबत निवारण केले असता त्यांनी अंतर्गत परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले. परंतु दुचाकीची चोरी ही पार्किंग परिसरातून झाल्यामुळे याठिकाणी सीसीटिव्ही नसल्याने काही हाती आले नाही.
सदर घटनेची माहिती वसुंधरा फाऊंडेशन यांच्याकडे दिली असता प्रशासनाने लवकरात लवकर पार्किंग सुरू करून दर्शनी भागात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावे असे निवेदन महासचिव सुहास येरूणकर, उपाध्यक्ष महेश देपोलकर, रोहा तालुका अध्यक्ष रुपेश मोरे, सदस्य अविनाश पवार, अभिजीत पाटणकर यांसह सर्व सहकार्‍यांनी दिले.

Exit mobile version