अलिबागमधून दुचाकी लंपास

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबागमधील श्रीबाग येथील घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी लंपास करण्यात आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळच्या दरम्यान घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीबाग दोनमधील म्हाडा वसाहतीनजीक घरासमोर फिर्यादीने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याची दुचाकी उभी केली होती. दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी त्यांना जागेवर दुचाकी दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला विचारणा केली, तरीही दुचाकी सापडली नाही. अखेर त्यांनी दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार गुरुवारी अलिबाग पोलीस ठाण्यात केली.

Exit mobile version