हर्षिता-भार्गवी इलेव्हन संघ विजयी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील बिरदोले गावातील क्रिकेट खेळाडू यांची बिरदोले प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आठ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत हर्षिता-भार्गवी इलेव्हन या संघाने प्रथम क्रमांक मिळविला असून बिरदोले प्रीमिअर लीगचे हे चौथे वर्षे होते. बिरदोले ग्रामस्थ मंडळ आणि सी सी मोरया क्रिकेट संघ यांनी बिरदोले प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन केले होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेला दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतचे सरपंच चिंधु तरे तसेच तावडे अॅकॅडमीचे गणेश तावडे यांचे सहकार्य होते. अंतिम सामन्यात हर्षिता-भार्गवी इलेव्हन या संघाने हितेश इलेव्हन संघाचा पराभव केला. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार हर्षल कालेकर तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून परेश वाळकू कालेकर तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून कुणाल संभाजी कालेकर आणि मॅन ऑफ दि मॅ चा मानकरी म्हणून कल्पेश किसन कालेकर व कल्पेश जगन्नाथ कालेकर या दोन खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
बिरदोले प्रमियर लीग स्पर्धा उत्साहात
