संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

| नेरळ | वार्ताहर |

चर्मकार समाजातील थोर संत रोहिदास महाराज यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील कोठिंबे येथे स्थानिक ग्रामस्थांनी संत रोहिदास जयंती साजरी केली. संत रोहिदास महाराज यांची जयंती कोंठीबे येथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी अनेक वेगवेगळे कार्यक्रम दिवसभरात नवतरुण मंडळ कुटुंबे यांच्या वतीने आयोजित केले होते. सत्यनारायण पूजा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व रात्री भजन कीर्तनत आयोजित केले होते. या वेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते कृष्णा जाधव तसेच ग्रामस्थ उपसरपंच अदित्य गायकवाड, हनुमंत खडे, मिलिंद डामसे, संजय डोके, मंगेश लोहकरे, बबन गायकवाड, राम गायकवाड, विलास गरुडे, अरुण गायकवाड, सुनील गरुडे,शंकर गायकवाड, गणेश गायकवाड, वसंत गायकवाड तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version