बैलगाडा शर्यतीच्या बैलाचा वाढदिवस

अंत्राट गावात काढली मिरवणूक

| नेरळ | प्रतिनिधी |

बैलगाडा शर्यतीचा नाद वेगळाच असतो, हे गेली दोन वर्षे कर्जत बैलगाडा शर्यतीचे महत्वाचे ठिकाण बनले आहे. तालुक्यात चक्क बैलगाडा शर्यतीच्या बैलाचा वाढदिवस समस्त गावकर्‍यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. दि बुलेट रॉयल किंग ग्रुप अंत्राटमधील डीजे या बैलाचा वाढदिवस मालकाने गावात मिरवणूक काढून साजरा केला.

अंत्राटतर्फे वरेडी हे गाव असून या गावातील डीजे हा बैल लोकप्रिय बनला आहे. मात्र, त्यात अंत्राट गावातील दि बुलेट किंग ग्रुपचा डीजे बैल हा बैल विशेष चर्चेत आहे. बैलगाडा शर्यतीची अनेक मैदाने मारणार्‍या डीजे या बैलाने मारल्याने या बैलाविषयी उत्सूकता निर्माण झाली आहे. आठ वर्षे वयाचा हा डीजे बैल आणि त्याचा ग्रुप यांनी आपल्या डीजेच्या चाहत्यांना खास भेट देतांना चक्क आपल्या लाडक्या डीजेचा वाढदिवस साजरा केला.

अंत्राट गावात मिरवणूक काढण्यात आली त्यात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. फटाक्यांची आतषबाजी आणि जोडीला डीजेची धूम यासह डीजे बैलाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर केक कापून साजरा करण्यात आला. तसेच जमलेल्या पाहुण्यासाठी जेवणावळी देण्यात आली.

Exit mobile version