चिंतामणरावांचे जन्मस्थळ उपेक्षित

कायापालट करण्याची नाते ग्रामस्थांची मागणी
| महाड | प्रतिनिधी |
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच अशी संसदेत गर्जना करीत व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर आपल्या केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा भिरकवणारे अर्थतज्ज्ञ डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे मुंबईतल्या चर्चगेट रेल्वे स्टेशनला नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला; परंतु महाड तालुक्यातील त्यांचे नाते येतील जन्मस्थळ असणारे घर मात्र अखेरची घटका मोजत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जन्मस्थळाचा करण्याच्या केलेल्या घोषणेचे काय झाले, असा सवाल नाते गावातील ग्रामस्थ शासनाला विचारीत आहेत.

चिंतामणरावांचे मूळ गाव असलेल्या महाड तालुक्यातील नाते गावात त्यांचे जन्मस्थळ आहे. या जन्मस्थळाचा कायापालट करण्याची घोषणा तत्कालीन आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, अडीच वर्षांत त्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता ना विद्यमान लोकप्रतिनिधींना ना रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाला झाली?

जन्मस्थळ अखेरची घटका मोजते!
चिंतामणराव देशमुख यांच्या नाते येतील जन्मस्थळावर म्हणजे जुन्या घराची आज पूर्णपणे पडझड झाली असून, या घरात साप, विंचू, उंदीर, घुशी यांनी कब्जा केला आहे. त्यांचे नाते येथील जुने घर आज अखेरची घटका मोजत असून, ते कधीही कोसळेल व जमीनदोस्त अशी प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी आपले नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली.

चिंतामणरावांचे स्मारक कधी?
देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाते येतील जुन्या घराचे स्मारक व्हायचे असते तर राज्य सरकार पेक्षा दरवर्षी रायगड जिल्हा नियोजन समितीमधून दरवर्षी या कामासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची जरी तरतूद केली असती तरी घराचे उरलेसुरले अवशेष उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असते व चिंतामणरावांच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला असता. मात्र, त्याबाबत सरकारमध्ये प्रचंड उदासीनता आहे, तशीच उदासीनता रायगड जिल्ह्यातील प्रशासनात काम करणार्‍या अधिकार्‍यांमध्ये असल्यामुळे या प्रशासनात काम करणार्‍या अधिकार्‍यांनीदेखील या उद्ध्वस्त घराला वाचवण्यापासून त्यांना बुद्धी झाली नाही, अशी प्रतिक्रिया नाते गावातील वयोवृद्ध नागरिकांनी बोलून

Exit mobile version