| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पुर्वसंध्येला निवडणुकीसाठी पैसे वाटताना ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चरच्या कर्मचाऱ्याला पकडण्यात आले आहे. या कंपनीचे मालक माजी खासदार रामशेठ ठाकूर व त्यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर हे आहेत. पनवेलमधील खारघर येथील प्रभाग क्रमांक 4 येथे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जगदीश घरत आणि महिला आघाडीच्या सहचिटणीस तेजस्विनी घरत यांनी संबंधित व्यक्तीला बुधवारी (दि.14) सायंकाळी साडेपाच वाजता पैसे वाटताना पकडले. यावेळी शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी पैसे वाटणाऱ्या व्यक्तीकडे मतदारांचा आणि सोसायटीच्या नावांच्या याद्या देखील सापडल्या आहेत. शेकापच्या आरोपानंतर तत्काळ निवडणूक आयोगाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.







