बोर्लीत भाजपला भगदाड; संदीप चिरायूंचा शेकापमध्ये प्रवेश

चित्रलेखा पाटील यांच्यामार्फत स्वागत

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील भाजपचे अलिबाग-मुरुड विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष, रायगड जिल्हा सोशल मीडियासह संयोजक संदीप चिरायू यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. आ. जयंत पाटील यांच्या वेश्वी येथील निवासस्थानी गुरुवारी (दि.15) रोजी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वामन चुनेकर, ग्रामपंचायत सदस्य मनोहर भोपी, संतोष देऊलकर, विनायक चोगले आदी शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संदीप चिरायू गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे पदाधिकारी म्हणून काम करीत होते. भाजपच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन वामन चुनेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकापमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी पक्ष प्रवेश करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी चिरायू यांच्या शेकाप पक्ष प्रवेशामुळे बोर्लीत भाजपला भगदाड पडले असून, त्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Exit mobile version