सत्तेत नसल्याने भाजप अस्वस्थ;जयंत पाटील यांची टीका

। उरण । वार्ताहर ।
भाजप सत्तेत नसल्याने इडी द्वारे महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास द्यायचे चालू आहे. भाजपचे नेते हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का ? अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी (11एप्रिल) उरण येथे केली
राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भावना विचार समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी उरण मध्ये ि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी उरण शहरातील यूईएस हायस्कूल येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाला खा.सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड, महिला जिल्हाध्यक्ष उमाताई मुंढे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी पदाधिकारी या दौर्‍या निमित्त उरण मध्ये उपस्थित होते. आपल्या भाषणात जयंत पाटील म्हणाले भविष्यात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांना योग्य ते स्थान दिले जाईल असे सांगत जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका पदाधिकारी कार्यकर्त्या समोर मांडली
खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात उरण करांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले प्रशांत भाऊ पाटील,भावना घाणेकर, वैजनाथ ठाकूर, भार्गव पाटील, मनोज भगत, गणेश नलावडे, हेमांगी पाटील,आनंद भिंगार्डे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version