। उरण । वार्ताहर ।
उरण विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तूपगावातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचाराने वेग घेतला असून ठीक ठिकाणी त्यांच्या प्रचाराच्या रॅलीचे स्वागत केले जात आहे. प्रीतम म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इतर पक्षातून शेकापमध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत. यातच तूपगावातील भाजपचे कार्यकर्ता सचिन साळवी , निखिल साळवी, प्रतिक साळवी, प्रथमेश साळवी, नंदकुमार साळवी, सुमित महप्रलकर, किशोर कुंभार, सुरेंद्र कुंभार, सिद्धेश थळकर, गणेश ठाकरे, सनी ठाकरे, सुनिल कांबळे, संदेश साळवी यांनी प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.