भाजपकडून स्वतःच्याच अब्रूचे धिंडवडे?

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

नगरपालिकेच्या निवडणूकीत मते मिळविण्यासाठी आश्वासनाचे गाजर

| अलिबाग | प्रतिनिधी |

मागील चार वर्षापासून नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट होती. राज्यात व केंद्रात भाजप, महायुतीची सत्ता होती. तरीदेखील अलिबाग शहरातील प्रश्नांची सोडवणूक करण्यास भाजप उदासीन ठरले. मात्र, निवडणूकीत मते मिळविण्यासाठी शहरातील समस्यांचा पाढा वाचला. परंतु, स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे त्यांनी पत्रकार परिषदेत काढल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे. त्यामुळे या निवडणूकीत भाजपला अलिबागची जनता जागा दाखविल अशी प्रतिक्रीया जनमानसातून उमटत आहे.

अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मते मिळविण्यासाठी भाजपच्या एका बड्या नेत्याने शहरातील डंपिंग ग्राऊड, क्रिंडागण आदी विषय पत्रकार परिषदेमध्ये मांडले. परंतु, अलिबाग नगरपरिषदेवर मागील चार वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. या राजवटीच्या कालावधीत सर्व अधिकारी शासनासह प्रशासनाकडे होते. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असतानादेखील शहरातील प्रश्नांची सोडवणूक भाजपला करता आली नाही. प्रशासकीय राजवटीच्या कालावधीत घरपट्टी माफ केली नाही. शहराच्या विस्ताराचाही विचार केला नाही. मात्र, निवडणूक जवळ आल्यावर आश्वासनाचे गाजर दाखविण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये स्वतःच्याच अब्रूचे धिंडवडे भाजपने काढल्याची चर्चा जोर धरत आहे.

Exit mobile version