पवार गटाकडून घोंगडी बैठका सुरु

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूक व पक्षाचा प्रचार यासाठी शरद पवार यांच्या पक्षाने घोंगडी बैठकीच्या माध्यमातून लोकसंपर्क, विचारांची देवाणघेवाण असा अभिनव उपक्रम हाती घेतला असून, त्याला चांगली लोकप्रियता व मोठा सहभाग मिळत आहे. ग्रामीण भागातून पहिला टप्पा सुरु झाला असून, दुसरा टप्पा थेट नवी मुंबईतून सुरु झाला आहे. यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे बेलापूर विधानसभा संयोजक डॉ. मंगेश आमले यांनी सांगितले.

या घोंगडी बैठक उपक्रमाची माहिती देण्यासाठी सानपाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. मंगेश आमले यांनी सांगितले की, संविधान वाचविणे व त्या अनुषंगातून विविध समस्या सोडविणे, जनतेला, मतदारांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळवून देणे हा मुख्य उद्देश घेऊन घोंगडी बैठक सुरु झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महासचिव रमेश जाधव, प्रवक्ते प्रकाश चव्हाण, माजी नगरसेविका संगीताताई बोराडे आदि उपस्थित होते. ग्रामीण भागात 20 तालुक्यात पहिल्या टप्प्यात 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान बैठका घेत नागरिकांशी संवाद साधला असल्याचे रमेश जाधव यांनी सांगितले.

Exit mobile version