पाच जणांचा मृत्यू, सात ते आठ जण जखमी
| नागपूर | वृत्तसंस्था |
नागपूर जिल्ह्यातील वाडीपासून काही अंतरावर असलेल्या धामनाजवळील स्फोटक बवणाऱ्या एका चामुंडा बारूद कंपनीत मोठा स्फोट होऊन त्यात पाच कामगारांचा मृत्यु झाला असून आठ ते दहा कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दगावलेल्यामध्ये चार महिला कामगारांचा समावेश आहे. घटनास्थळी गर्दी झाल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून दगावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू होता.
नागपूर जिल्ह्यातील ठामणा येथे चारमुंडी नावाची स्फोटकं बनवणारी कंपनी आहे. याठिकाणी दुपारी 12.30 च्या सुमारास कंपनीत अचानक स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज झाला. या कंपनीमध्ये यावेळी 10 ते 12 कामगार कामकरत असताना त्यात 5 कामगारांचा कंपनीत मृत्यू झाला तर सात ते आठ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, कोणालाही आतमध्ये जाण्यास बंदी आहे. स्फोटकं आतमध्ये असल्याने याची खबरदारी घेतली जात आहे. स्फोट कसा झाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मृत्यु झालेले कामगार हे वाडी आणि धामना परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली असून त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनेनंतर लगेचच परिसरातील नागरिकांनी जखमी कामगारांना तात्काळ रविनंगरातील सेनगुप्ता रुग्णालयात हलविले असून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. रुग्णालयात कामगारांच्या नातावाईकांची गर्दी झाली.
दरम्यान, कंपनीत स्फोट झाल्यामुळे धामना परिसर हादरुन गेला. आजूबाजूच्या कंपनीतील कामगार घटनास्थळी आले. राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर घटनेची माहिती घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांशी व कंपनीच्या मालकांशी चर्चा केली. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.