थळमधील आरसीएफ कंपनीत स्फोट; तिघांचा मृत्यू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील थळ, वायशेत येथील आरसीएफ कंपनीत गॅस टर्बाइन युनिटच्या रेफ्रिजरेशन प्लांटमध्ये भीषण स्फोट झाला. ही घटना बुधवारी (दि.19) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली.

या अपघातात एक मॅनेजमेंट ट्रेनीसह एकूण तिघांचा मृत्यू झाला असून आठजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरसीएफ कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात मयत पावलेल्या व्यक्तींची माहिती-

1)दिलशाद आलम इद्रिसी- वय 29 – कुर्ला पश्चिम, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी

2)फैजान शेख- वय 33- कुर्ला पश्चिम, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी

3)अंकित शर्मा- वय 27- आर.सी.एफ कर्मचारी

Exit mobile version