डोंबिवली एमआयडीसीमध्ये स्फोट; अनेक जखमी

| डोंबिवली | वृत्तसंस्था |

मुंबई- डोंबिवली एमआयडीसीमध्ये एका कंपनीत मोठा ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. एमआयडीसी फेज दोनमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटामुळे डोंबिवलीकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आकाशामध्ये धुराचे लोट पसरत आहेत. स्फोटामुळे परिसरात मोठा हादरा बसला आहे. अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना एम्स रुग्णालयात हलवले जात आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग सिलेंडरची आहे, की इतर कशाची याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण, बॉयलर स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप जीवितहानीची माहिती नाही. पण, अनेकजण जखमी झाले आहेत.

आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सदर, कंपनी केमिकलची असल्याने भीती व्यक्त केली जात आहे. तूर्तास आग विझवणे शक्य होत नाही. आग वाढतच आहे. आजूबाजूच्या कंपनीमध्ये आग पसरत चालल्याची माहिती आहे. अधिकच्या अग्निशमनच्या गाड्या परिसरातून मागवल्या जात आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

Exit mobile version