। तळा । वार्ताहर ।
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला-वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष पुरूषोत्तम मुळे, मंगेश देशमुख, महेंद्र कजबजे, डॉ. नानासाहेब यादव, दिलीप ढाकणे, संस्थेचे पदाधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पुरूषोत्तम मुळे यांनी बारावी नंतर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत कोणत्या संधी आहेत? या विषयावर मार्गदर्शन केले. सचिव मंगेश देशमुख यांनी स्पर्धेच्या युगात चांगली प्रगती करण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत या तीन गोष्टींचा अवलंब करावा, असे आवाहन केले. महेंद्र कजबजे यांनी आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा सलग पाच वेळा बोर्डात प्रथम क्रमांकाचा निकाल लागला असून विध्यार्थ्यांना भविष्य घडवायचं असेल तर कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे प्रतिपादन केले.