| कोलाड | प्रतिनिधी |
अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कोलाड यांच्या वतीने रविवारी (दि.7) प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेवाडी येथे रक्तदान शिबीर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी सर्व रक्तदात्यांना कोलाड केंद्राच्या वतीने कृपासिंधु दिनदर्शिका 2026 भेट म्हणून देण्यात आली. या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घातले. शासकीय रक्तपेढी अलिबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित पद्धतीने 36 रक्तदान पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि आरोग्य तपासणी अहवाल देण्यात आला. सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कोलाड यांनी शिबिराचे उत्तम नियोजन करून सर्व व्यवस्थापन सुरळीत पार पाडले. या उपक्रमामुळे तातडीच्या वेळी रक्ताची उपलब्धता वाढून रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.







