। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड ,अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रभाकर पाटील ( भाऊ ) यांच्या जयंतीचे औचित्य साधून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत, या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.ओमकार पोटे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमक अधिकारी डॉ. दीपक गोसावी व त्यांचे सहकारी यांनी पस्थिती लाभली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या कला विभाग प्रमुख प्रा.नम्रता पाटील, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. सुजित पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पल्लवी पाटील, प्रा. कैलाससिंग राजपूत, प्रा. पूजा पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. दीपक गोसावी यांनी रक्तदान का करावे ? त्याची आवश्यकता काय आहे ? त्याचा भावी आयुष्यात कसा व कोणासाठी उपयोग होतो ? याची विस्तृत कल्पना विद्यार्थ्यांना दिली. तर कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्षीय वक्तव्य करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व सांगत उपस्थितांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे, रक्तदान हेच जीवदान आहे असे त्यांनी आपल्या वक्तव्यात आवर्जून नमूद केले. त्याचप्रमाणे त्यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून स्वतः प्रथम रक्तदान करून केले.
पी.एन.पी संकुलातील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रवींद्र पाटील, उपप्राचार्य प्रा. निशिकांत कोळसे, प्रा. तेजेश म्हात्रे तसेच बी.एड कॉलेजच्या प्रा.ऋतिषा पाटील, होली चाईल्ड इंग्लिश मिडीयम सी.बी.एस.सी स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती. वेणी आणि उपमुख्याध्यापिका सदफ शहाबाजकर, इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले आदी मान्यवर उपस्थित राहून रक्तदान सुद्धा केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. पल्लवी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. कैलास सिंग राजपूत यांनी केले. आभार प्रा. पूजा पाटील यांनी मानले. या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.