| नेरळ | वार्ताहर |
नेरळ येथे मातोश्री सुमती टिपणीस महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विद्या मंदिर मंडळाचे विवेक पोतदार, डॉ. मिलिंद पोतदार, प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रक्त संक्रमणाचे काम ट्रॉमा हॉस्पिटल जोगेश्वरी, मुंबई यांच्या डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाने केले.
या शिबिरात 43 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. सोनम गुप्ता, राष्ट्रीय सेवा योजना विभाग सहाय्यक अधिकारी प्रा. अनंत घरत, अजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग समन्वयक प्रा. अमोल सोनवणे, प्रा. सागर मोहिते, संतोष तुरुकमाने, प्रा. विकास घारे, प्रा. वैभव बोराडे, प्रा. धनंजय कोटांगळे, प्रा. नमेश्वर रजपूत आदींनी मेहनत घेतली.