| रसायनी | वार्ताहर |
महाराष्ट्रदिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष आणि तेरणा मेडिकल ट्रस्ट आयोजित भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी 158 नागरिकांनी या शिबिरात रक्तदान केले. या रक्तदात्यांना माजी आमदार बाळाराम पाटील यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. या शिबीरात पाताळगंगा परिसरातील कासप येथील युवा कार्यकर्ते दशरथ गायकर यांनी रक्तदान केले.