| पनवेल | वार्ताहर |
खारघर सेक्टर 36 मधील सिडकोने बांधलेल्या स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीमध्ये नवरात्र उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे सहावे वर्ष असून यावर्षी त्यांनी सामाजिक उपक्रम राबवत असताना टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये संकुलातील 78 लोकांनी रक्तदान केले आणि आपली सामाजिक भावना दाखवून दिली. याचवेळी आरोग्य शिबिराचेसुद्धा आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदाब, निरोपती इसीजी, नेत्र तपासणी आदी करण्यात आले. याचासुद्धा लाभ स्वप्नपूर्ती संकुलातील नागरिकांनी घेतला.
स्वप्नपूर्ती सांस्कृतिक उत्सव मंडळ हे रजिस्टर मंडळ असून संकुलामध्ये नवरात्र उत्सव साजरा करत असताना दरवर्षी विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबवत आहे. या वर्षीसुद्धा त्यांनी लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग, समस्त नागरिकांसाठी श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ बोलवली, तालुका खालापूर यांच्या उत्कृष्ट अशा भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याचा आस्वाद स्वप्नपूर्तीमधील नागरिकांनी घेतला. या सर्व कामासाठी स्वप्नपूर्ती सांस्कृतिक उत्सव मंडळाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद बिबवे, अध्यक्ष सचिन बारवे, सचिव संदीप खोचरे, उपाध्यक्ष मनोज मोहोड, खजिनदार नागेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत.