| अलिबाग | प्रतिनिधी |
कच्छ युवक संघ अलिबाग, लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील कच्छी भवन येथे रविवार, दि. 6 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 100 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या रुग्णांना रक्तांची गरज निर्माण होते. अपघातग्रस्त अथवा अन्य रुग्णांना रक्ताची मदत तातडीने व्हावी, त्यांना रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी अलिबागमधील कच्छ युवर संघाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचा उपक्रम हाती घेतला.
सुरुवातीला रुपाली मगर, समिक्षा भगत, ओमकार घरत, निकेश पाटील, विराज कडपे यांनी रक्तदान करून साामाजिक बांधिलकी जपली. त्यानंतर मोठ्या संख्येने रक्तदाते रक्तदानासाठी पुढे आले. एकूण 100 पेक्षा अधिक रकतदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरानिमित्त मधुमेह, रक्तदाब, नेत्र तपासणी करण्यात आली. पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे आयोजन करण्यात आले.