माणगावात शिवजयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर

| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुका पत्रकार संघ आणि विविध सामाजिक संघटना यांच्यावतीने यावर्षीही सलग पाचव्या वर्षी शिवजयंती निमित्त शनिवारी.19 फेब्रुवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन सरलादेवी मंगल कार्यालय माणगाव येथे करण्यात आले आहे. शिबिराचे उदघाटन सकाळी 10 वाजता नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून हे शिबीर सकाळी 10 ते सायंकाळी 4 यावेळेत सुरु राहणार आहे.तरी रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. हे शिबीर के.ई.एम रुग्णालय परेल मुंबई यांच्या सौजन्याने व विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना लगेचच रक्तदान केल्याचे ओळखपत्र त्याठिकाणी देण्यात येणार आहे.यावेळी राजकीय,सामाजिक,प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version