श्रीवर्धनमध्ये महारक्तदान शिबीर

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने स्व-स्वरूप संप्रदायातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. महाराष्ट्रात शिकलसेल अनेमिया, हिमोफिलीया, थॅलॅसेमीआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्यूअर पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्यावतीने ठरविण्यात आले आहे. या धर्तीवर 16 फेब्रुवारी रोजी श्रीवर्धन शहरातील जिल्हा उप-रुग्णालय श्रीवर्धन आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली पंचतन येथे 11 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने देण्यात आली आहे.

Exit mobile version