उरणमध्ये रक्तदान शिबीर


। उरण । वार्ताहर ।
शाम म्हात्रे सामजिक विकास मंडळ, कोकण श्रमिक संघ, एकता कॅटलिस्ट, आगरी शिक्षण संस्था, बी.एम.टी.सी. कर्मचारी पुनर्वसन समिती, गणेश मंदीर ट्रस्ट, पनवेल, सावळा ग्रामपंचायत, आर्क फाऊंडेशन, चाणजे जमीन बचाव संघर्ष समिती, करंजा विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एम. जी. एम हॉस्पिटल कामोठे आणि मसिना हॉस्पिटल, मुंबई यांच्या माध्यमातुन दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या तृतीय पुण्यतिथीच्या निमित्ताने सामजिक भावनेतून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.

बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 3:30 दरम्यान आगरी शिक्षण संस्था, प्लॉट 12 अ आणि ब सेक्टर-6, खांदा कॉलनी, पनवेल तसेच प्राथमिक शाळा सावळा गाव, ता.पनवेल, पोस्ट रसायनी आणि समाज प्रबोधन शाळा, आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके सभागृह, मुळेखंड, तेलिपाड्या समोर, उरण पनवेल रोड, ओएनजीसी कॉलनी जवळ, उरण या तिन्ही ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिन्ही ठिकाण मिळून या सामाजिक उपक्रमातून एकूण 103 हुन अधिक रक्त जमा झाले.

Exit mobile version