। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील नावाजलेले व सामाजिक कार्यात कार्यरत रहणाऱ्या पेठेचा राजा अर्थात बाल मित्र मंडळ नवीपेठ शिंपी आळीतर्फे 58 व्या गणेशोत्सचे औचित साधत तिसऱ्या रक्तदान शिबिराचे आयोजन 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 2 पर्यंत करण्यात आले होते.
रक्ताची निकड लक्षात घेता मंडळातर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरादरम्यान 46 रक्तदात्यानी रक्तदान करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. काकासाहेब चितळे स्मृति केंद्र संचलित, जनकल्याण रक्तकेंद्र महाडचे डॉ. चिन्मय शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, भ्रांती खोपकर, रविकांत शिंदे, सरस्वती पाटोळे, नमिरा चरफळे, नीलिमा कदम, चालक रामचंद्र उडरे यांच्या उपस्थित जवळपास 46 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. यावेळी महिलांनी सुद्धा रक्तदान करत आपला सहभाग नोंदविला.
यावेळी मंडळाचे साहिल हेलेकर यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची माहिती देत नागरिकांनी रक्तदान करावे. तसेच, देशातील रक्ताची निकड लक्षात घेता विविध मंडळ व सामाजिक संस्था हे शिबिराचे आयोजन करत आहेत, त्यालाच अनुसरून सलग तिसऱ्या वर्षी महारक्तदान यशस्वी आयोजन केल्याचे सांगितले.
तसेच, जनकल्याण रक्तपेढीचे रविकांत शिंदे यांनी रक्तपेढीचे उपक्रम सांगत रक्तदान संकल्पनासह व रक्तदात्यांनी साखळी वेगाने वाढत असल्याचे आणि रक्तदान शिबिरास प्रतिसाद मिळत असून त्यामध्ये वाढ होणे गरजेचे असल्याचे मत व्यक केले.






