गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सूर्योदय साखर चौथ गणेशोत्सव मंडळ थळ पालथी यांच्यावतीने साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त शनिवारी (दि. 21) रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दररोज रक्ताची भासणारी गरज आणि दुसरीकडे रक्ताची निर्माण होणारी टंचाई लक्षात घेता सामाजिक जाणिवेतून सूर्यादय साखरचौथ गणेशोत्सव मंडळाकडून रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षांचे हस्ते करण्यात आले. या शिबिरादरम्यान रक्तसंकलनासाठी जिल्हा शासकीय रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी यांच्या नेतृत्वाखालील टीमने मोलाची कामगिरी बजावली. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Exit mobile version