शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर

। तळा । वार्ताहर ।
रक्ताचा तुटवडा भासत असल्याने शिवजयंती उत्सवाच्या औचित्य साधून रक्तदान शिबीर ब्राह्मण सभा हॉल, मधली आळी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, उपतालुका प्रमुख शरद सारगे, शहरप्रमुख राकेश वडके, नगरसेविका नेहा पांढरकामे, नमीत पांढरकामे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी तळा प्रेस क्लबच्या सर्व पत्रकारांचा यथोचित करून रक्तदात्यांना प्रमाणपत्र, भेट वस्तू, गुलाब पुष्प देण्यात आले. जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग डॉ.मोहन गोसावी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान करत 50 बँगचे उद्दिष्ट पार केले.

Exit mobile version