| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील लेकलँड केमिकल लिमिटेड, माडप खालापूर आणि पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच टाटा कॅन्सर सेंटर हॉस्पिटल, खारघर यांच्या संयुक्त विद्यमानाने के.एल.जी. ग्रुपचे मालक कन्हैयालाल जैन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.2) कंपनी परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास कंपनीतील कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे 70 ते 80 कामगारांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण दाखवून दिले. रक्तदान हे जीवनदान असून समाजासाठी अत्यंत उपयुक्त कार्य असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.यावेळी चाळीस पिशव्या रक्तसंकलित करण्यात आल्या. कार्यक्रमावेळी कंपनीचे मॅनेजर राजेंद्र पाटील, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोविंद जाधव, तसेच टाटा कॅन्सर सेंटर हॉस्पिटल, खारघर येथील डॉ. अभिजीत रावटळे व वैद्यकीय पथक उपस्थित होते. वैद्यकीय नियमांचे पालन करत सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने रक्तसंकलन करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
