सहाणगोठी येथील शिबीरात 53 जणांचे रक्तदान;आ. जयंत पाटील यांची उपस्थिती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शहीद निलेश तुणतुणे स्मारक सहाणगोठी येथे टीचर फाउंडेशन अलिबाग, न्यू कट्टा मित्र मंडळ, सहाणगोठी आणि ओम साई मित्र मंडळ बामणगाव पंचक्रोशी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आणि सीबीसी टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण 53 रक्त दात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला.

सदर रक्तदान शिबीरा दरम्यान शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या शिबीराला खूप चांगला प्रतिसाद शिक्षक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील तरुणांनी दिला. या कार्यक्रमाला जिल्हा रुग्णालय अलिबाग रक्तपेढी टीमच्या माध्यमातून डॉ दिपक गोसावी आणि सहकारी यांनी खूप चांगले सहकार्य केले.

टीचर फाउंडेशन अलिबागचे अध्यक्ष संजय पोईलकर, उपाध्यक्ष शिवाजी दराडे, सचिव दिनेश टोपले, खजिनदार निलेश वारगे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सीबीसी टेस्ट करण्यासाठी मेट्रोपॉलिस गरुड पाडा लॅब सागर फाळके यांनी अगदी सवलतीच्या दरात तपासणी केली. तसेच सतीश भगत, समिर पाटील, सचिन पाटील, रणजीत तुणतुणे या ओम साई मंडळातून सहकार्य मिळाले. आणि न्यू कट्टा मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version