तिलारीत आढळली रक्ताने माखलेली कार

| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी येथील मुख्य वसाहती जवळील पुलाच्या बाजूला एक कार रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळली. हा प्रकार गुरुवारी (दि.23) सकाळच्या सुमारास समोर आला. या प्रकारमुळे दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदर कारची नंबर प्लेट गायब असल्याने अपघात की घातपात? याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तिलारी कोनाळकट्टा मुख्य धरणाच्या पुच्छ कालव्यावरील पुलाखाली सकाळी काही नागरिकांना एक संशयास्पद कार दिसली. ही कार झाडीत अर्धवट चिखलात रुतली होती. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर वाहनाच्या आतील भागात आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसून आले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली असता दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मात्र, कारची नंबर प्लेट गायब असल्याने वाहन नेमके कोणाचे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, आत कोणीही व्यक्ती आढळली नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version