निवडणूक कालावधीत बीएलओनी सतर्क राहावे; तहसीलदार घारे

| म्हसळा | वार्ताहर |

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व बीएलओचीं सभा पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार समीर घारे यांनी सर्व उपस्थितांना महत्वाच्या सूचना देताना निवडणूक कालावधीत बी.एल.ओ.नीं आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून सतर्क राहण्याचे आदेश दिले. त्यामध्ये नमुना नं -6 फॉर्म 9 एप्रिलपर्यंत जमा करण्याच्या सूचना दिल्या.

कोणत्याही प्रकारची राजकीय पोस्ट टाकू नये, दिव्यांग उमेदवारमध्ये ज्या मतदाराला अजिबात चालता येत नाही त्यांचा 12-ड फॉर्म भरावा, मतदान केंद्रावर देण्यात येणारे स्टिकर दिलेल्या मुदतीतच लावणे, 1 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी विचारात घावी, ज्या मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करणे, ऊन असल्यामुळे सावलीची सोय करावी, स्वच्छता गृह, दरवाजे, खिडक्या, वीज सुविधा यांकडे गांभीर्याने लक्ष देणे. मतदान केंद्रावरील राजकारणाशी संबंधीत नेत्याचे फोटो (महापुरुषांचे वगळून ) काढून ठेवावेत, फलकावरील मंत्रिमंडळ यादी पुसून टाकणे अश्या सूचना देऊन बूथ लेवलला मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करणे, गावातील बंद घरातील मतदारांची चौकशी करून ते मतदार मतदानासाठी उपलब्ध राहतील कि नाही या बाबत नोंदी ठेवणे. अश्या अनेक सूचना तहसीलदार समीर घारे यांनी दिल्या. निवडणूक नायब तहसीलदार संध्या अंबुर्ले यांनीही बी.एल.ओ.ना अत्यावश्यक सूचना दिल्या.

Exit mobile version