पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लावले फलक

| पनवेल | वार्ताहर |

नुकताच पावसाळा सुरू झाल्याने वर्षा सहलीसाठी मोठ्या प्रमाणात मुंबई, नवी मुंबई व उपनगरे परिसरातून नागरिक येत असतात. परंतु येथील वातावरण व भौगोलिक परिस्थितीचा अंदाज त्यांना येत नसल्याने अनेकांचे नाहक जीव जातात. हे जीव वाचविण्याच्यादृष्टीने पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करणारी फलके उभारली आहेत. व त्यातून महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये प्रामुख्याने नदी पात्रात जाणे अत्यंत धोकादायक आहे, नदी पात्रामध्ये बर्याच ठिकाणी मोठे व खोल डोह असल्याने ते समजुन येत नाहीत. पावसाळी पर्यटकांना गाढेश्वर धरण, वारदोली धबधबा, मोर्बे धरण, कुंडी धबधबा (अर्पिता फार्म हाऊस जवळील धबधबा) हरिग्राम नदीपात्र, धोदाणी नदीपात्र, चिंध्रण व मोहोदर नदीपात्र, शांतीवन नदीपात्र, माची प्रबळ, या ठिकाणी भेटी देण्यास मनाई आदेश काढण्यात आल्याची माहिती वपोनि अनिल पाटील यांनी या फलकाद्वारे दिली आहे.

त्याचप्रमाणे वरीलप्रमाणे कृती करताना कोणी आढळुन आल्यास तात्काळ पनवेल तालुका पोलीस ठाणे संपर्क 98196791000/02227452444 तसेच, डायल 112 यावर संपर्क साधुन माहिती द्यावी, असे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे.

Exit mobile version